श्रीक्षेत्र निनगुर येथील श्री कालिका देवीचा ३ एप्रिलपासून यात्रौत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीक्षेत्र निनगुर येथील श्री कालिका देवीचा ३ एप्रिलपासून यात्रौत्सव

  राहुरी(महेश कासार)  सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र निनगुर (नेकनुर ता जि बीड) येथील श्री कालिका देवीचा यात्रा...

 राहुरी(महेश कासार)



 सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र निनगुर (नेकनुर ता जि बीड) येथील श्री कालिका देवीचा यात्रा उत्सव चैत्र शु ||द्वादशी सोमवार दिनांक ३एप्रिल ते चैत्र शू||पौर्णिमा गुरुवार दिनांक ६एप्रिल २०२३या कालावधीत विविध धार्मिक सामाजिक उपक्रमानी संपन्न होणार आहे आशी माहिती देवस्थानाचे अध्यक्ष  शिवाजीराव काटकर सचिव डाॅ सोनाजीराव पाटील यांनी दिली

         यात्रा उत्सव काळात सकाळी ६वा सप्तशती पाठ, ७वा श्रीकालिकामातेस विधिवत अभिषेक आरती,  सायंकाळी ७वा आरती,     नैवेद्य  ,व  आराधना ,(महाप्रसाद) मुख्य दिवस चैत्र शु पोर्णिमा गुरुवार दि ६एप्रिल रोजी दुपारी २वा देवस्थानच्या वतीने समाज बांधवाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे सभेचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सो क्ष कासार समाजाचे अध्यक्ष शरद भांडेकर भुषविणार आहेत . या प्रसंगी समाजातील विविध मान्यवरांच्या सत्कार ,   रात्री १०वा श्री चा छबिना निघून शोभेच्या दारू कामाने उत्सवाची सांगता होणार आहे

     .     बुधवार दिनांक ५एप्रिल रोजी  दुपारी २वा लिंबा गणेश येथील महिला मंडळाच्या वतीने संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.  रात्री १०वा विविध गुणदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे 

           समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून  श्री कालिका मातेच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन महेश कासार,  देवीदास दहिवाले, गणेश कासार, बंडू निनगुरकर, अशोक निनगुरकर, वैभव खुटाळे, किशोर निनगुरकर राम पाथरकर संजय कासार यांच्या वतीने 

करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत