किसन पवार पत्रकारितेतील पश्चिम महाराष्ट्र 'विभागीय' पुरस्काराने सन्मानीत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

किसन पवार पत्रकारितेतील पश्चिम महाराष्ट्र 'विभागीय' पुरस्काराने सन्मानीत

चांदेकसारे (वेबटीम)  पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी करण्यात आले....

चांदेकसारे (वेबटीम)



 पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी करण्यात आले. सहकार मंत्री ना. अतुल सावे यांच्या हस्ते कोपरगाव तालुक्यातील घारी येथील पत्रकार किसन पवार यांना पश्चिम महाराष्ट्र विभागीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 

गेल्या काही वर्षात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील विविध प्रश्नावर अभ्यासपूर्ण लखाण करून आपल्या पारदर्शक निर्भीड व अभ्यासू पत्रकारितेचा ठसा पवार यांनी उमटविला.

याची दखल घेत पश्चिम महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना विभागीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ ज्योती पवार उपस्थित होत्या. राज्यस्तरीय पत्रकारिता विशेष गौरव पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना. अतुल सावे,दै. 'मराठवाडा साथी' चे संपादक जगदीश बियाणी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, बाजीराव खांदवे, केशव काळे, गोदावरी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाषराव होन, चांदेकसारे चे सरपंच किरण होन, कर सल्लागार काकासाहेब पवार, पुणे येथून सॅवील प्रॉपर्टी सर्विसेस चे डायरेक्टर योगेश पवार, विधीज्ञ नितीश पवार, प्राजक्ता पवार, आशिष पवार, राजेंद्र होन, रावसाहेब होन, मनोहर होन, अर्जुन होन, धीरज बोरावके, छत्रपती संभाजी नगर येथील उद्योजक जनार्दन लांडे, राजेंद्र निंबाळकर, पोहेगाव येथील प्रगतशील शेतकरी मुकुंद औताडे, प्रतिभा औताडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्रांमध्ये कोपरगाव तालुक्यातील पत्रकारिते सोबतच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी यासह विविध क्षेत्रात वृत्तपत्राच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत