राहुरी फॅक्टरी सपना वेलनेस सेंटरचे उद्घाटन संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी सपना वेलनेस सेंटरचे उद्घाटन संपन्न

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड येथील कराड कॉर्नर येथे सपना वेलनेस सेंटर या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. द...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड येथील कराड कॉर्नर येथे सपना वेलनेस सेंटर या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.



देवळाली नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा ज्योती त्रिभुवन तसेच साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांचे हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.


सपना वेलनेस सेंटरच्या संचालिका सौ.राधा गोरख गवांदे,सौ.सविता संजय मोरे आणि विशाखा मोरे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.


नियमित व्यायाम,झुंबा डान्सिंग आणि आहार विषयक माहिती देऊन,या ठिकाणी वजन वाढवणे किंवा कमी करणे,शरीरातील नको असलेली चरबी कमी करणे,स्त्रियांचे PCOD किंवा PCOC विषयक समस्यांचे निराकरण तसेच मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


 यासाठी इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.उद्घाटन प्रसंगी महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

प्रसंगी सपना वेलनेस च्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.   


नामवंत नृत्य शिक्षिका विशाखा मोरे यांचे वतीने नटराज क्लासिकल,हीप हॉप,वेस्टर्न,बॉलीवूड इत्यादी नृत्य प्रकार शिकवले जाणार असून राहुरी फॅक्टरी आणि पंचक्रोशी परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांना माफक दरात प्रशिक्षण दिले  जाणार आहे.


तरी इच्छुकांनी सपना वेलनेस सेंटर, कऱ्हाड कॉर्नर, ताहाराबाद रोड,राहुरी फॅक्टरी याठिकाणी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत