‘प्रांत’च्या कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

‘प्रांत’च्या कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीला

आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील रहिवासी राजेश दत्तात्रय कवाने यांची एम.एच. १७, बी.यु. ६४५५ क्रमांकाची व काळ्या रंगाची बजाज ...

आंबी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील रहिवासी राजेश दत्तात्रय कवाने यांची एम.एच. १७, बी.यु. ६४५५ क्रमांकाची व काळ्या रंगाची बजाज कंपनीची प्लाटीना ही गाडी अज्ञात चोरट्यांनी राहत्या घरासमोरून चोरून नेली. ही घटना गुरूवारी (दि. १३) मध्यरात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. राजेश कवाने हे श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांत कार्यालयात नेटवर्किंग इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. ते मुसळवाडी रोड, रेल्वे स्टेशन जवळ, टाकळीमियाँ येथे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. 


नेहमी प्रमाणे रात्री घराबाहेर दुचाकी लावून झोपी गेले. पहाटे उठल्यावर दुचाकी चोरी गेल्याचे  कवाने यांच्या लक्षात आले. इतरत्र पाहणी केली असता दुचाकी आढळून आली नाही. त्यामुळे कवाने यांनी सकाळी राहुरी पोलिस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत