राहुरीत आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली भीमजयंती उत्साहात साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली भीमजयंती उत्साहात साजरी

  राहुरी( प्रतिनिधी) विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकशाहीचे जनक म्हटले तरी काही वावगं ठरणार नाही. त्यांनी जी घटना लिहीली, ...

 राहुरी( प्रतिनिधी)



विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकशाहीचे जनक म्हटले तरी काही वावगं ठरणार नाही. त्यांनी जी घटना लिहीली, त्या घटनेवर संपूर्ण देशाचा कारभार चालत आहे. असे प्रतिपादन राहुरी येथील तहसीलदार फसियोद्दिन शेख यांनी केले. 

       राहुरी येथील आरपीआय आठवले गटाच्या वतीने व तालूकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली आज बस स्थानक परिसरात भिम जयंती आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तहसीलदार फसियोद्दिन शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

          या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे, शिवाजी अप्पा कपाळे, राजूभाऊ आढाव, प्रवीण लोखंडे, आर आर तनपूरे, अरूण साळवे, डाॅ. स्वप्निल माने, अनुसंगम शिंदे, सुनिल चांदणे, पत्रकार रफिक शेख, समता परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे आदि उपस्थित होते. 

        यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वही पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच तालूक्यात राहुरी शहरातील राजवाडा येथे प्रथमच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवीण्यात आला होता. त्यावेळी पुतळा उभारणीसाठी महत्वाचे योगदान दिलेल्या ज्येष्ठ सदस्य व कार्यकर्त्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन साळवे यांनी केले. 

          तसेच राहुरी शहरातील राजवाडा येथील समाज मंदिरात आज सकाळी सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या ठिकाणी भिम जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मुलींनी भिम गितांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. तर रावसाहेब चाचा तनपूरे यांनी त्यांचे मनभरून कौतुक केले. या प्रसंगी राजेंद्र वाडेकर, सोन्याबापू जगधने, सुनील पवार, प्रशांत शिंदे, नारायण धोंगडे, जिवन गुलदगड, बाळासाहेब गिरमे, आरपीआय महिला आघाडी तालूकाध्यक्षा स्नेहल सांगळे आदि उपस्थित होते. 

        या प्रसंगी उत्सव समितीच्या वतीने रावसाहेब चाचा तनपूरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांना संविधानाची प्रत तसेच शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिम जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत