राहूरीतील सर्जा हॉटेल येथे हॉटेल मालक व कामगारांना शिवीगाळ व दमदाटी , राहुरी पोलिसात तिघांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरीतील सर्जा हॉटेल येथे हॉटेल मालक व कामगारांना शिवीगाळ व दमदाटी , राहुरी पोलिसात तिघांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

  राहुरी(वेबटीम) राहुरी येथील नगर-मनमाड मार्गावरील हॉटेल सर्जा येथे हॉटेल मालक व कामगारास शिवीगाळ, दमदाटी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी येथील नगर-मनमाड मार्गावरील हॉटेल सर्जा येथे हॉटेल मालक व कामगारास शिवीगाळ, दमदाटी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राहुरी खुर्द येथील  किरण तास्कर, प्रवीण भांड, प्रमोद डौले हे हॉटेल सर्जा येथे १४ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता आले असता मॅनेजर ज्ञानेश्वर चिंधे यास आमच्या जेवणाची ऑर्डर घ्या असे म्हणाले त्यावर मॅनेजर चिंधे याने हॉटेल बंद झाले आहे, कुक घरी गेला आहे, तुम्हाला जेवण मिळणार नाही, असे म्हंटल्याचा राग आल्याने त्यांनी मॅनेजर चिंधे यांना शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी हॉटेल मालक तथा फिर्यादी सतीश घुले व कामगार भांडणे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनी फिर्यादी घुले व कामगारांना  शिवीगाळ, दमदाटी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.


याबाबत सतीश घुले यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात किरण तास्कर, प्रवीण भांड, प्रमोद डौले या तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री.खरात करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत