चंद्रजित राजपूत राहुरीचे तहसीलदार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चंद्रजित राजपूत राहुरीचे तहसीलदार

राहुरी(श्रीकांत जाधव) राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांची बदली झाली असून मालेगाव येथुन बदलून आलेले  चंद्रसिग राजपूत आता राहुरी महसूलचा कारभार ...

राहुरी(श्रीकांत जाधव)



राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांची बदली झाली असून मालेगाव येथुन बदलून आलेले  चंद्रसिग राजपूत आता राहुरी महसूलचा कारभार हाकणार आहेत.


     राहुरीत तहसीलदार म्हणून चार वर्षाहून अधिक  कार्यकाळ पार पडणारे तहसीलदार शेख यांनी कोविडसह पुरजन्य परिस्थीतीत तसेच आपत्ती काळात उत्तम प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देखील उत्तम प्रशासक म्हणून तहसीलदार शेख यांचा गौरव केला होता. शेतक-यांच्या निगडीत असलेल्या रस्ता केसमधे सर्वाधिक रस्ते खुले करून शेतक-यांच्या समस्या सोडवण्यात त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे.

येत्या  सोमवार पर्यंत नविन तहसीलदार पदभार स्विकारतील अशी माहीती मिळते.आता राहुरीत नव्याने तहसीलदार म्हणून चंद्रजीत राजपुत याचा कार्यकाळ कसा असणार याकडे लक्ष लागले आहे.

नव्याने आलेले चंद्रजित राजपूत यांचीही तहसीलदार शेख यांच्याप्रमाणेच  उत्तम प्रशासक  अधिकारी म्हणून ओळख आहे. मालेगाव येथे काम करत असताना अनेक लोकाभिमुख कामे त्यांनी मार्गी लावले. मात्र  काही प्रमाणात स्थानिक मंत्री व आमदार, माजी आमदार, विविध संघटना  यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले होते. मात्र तरीही न डगमगता जनता केंद्रस्थानी समजून कामाचा तडाखा सुरूच ठेवला.




*'या' बड्या नेत्याचा कारखाना केला होता सील*

शेकाप नेते जयंत पाटील यांच्या रावळगाव येथील एस. जे. शुगर साखर कारखान्याकडे २०२०-२१ मधील गळीत हंगामामधील एफआरपीपोटी १७ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपये  रक्कम थकीत होती.थकीत एफआरपी वसुलीसाठी साखर आयुक्तांच्या आदेशान्वये, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार येथील तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी एस. जे. शुगरची २३ कोटी ७१ लाख रुपयांची साखर, ३५ लाखांची कच्ची साखर, मोलॅसेस व बॅग असा एकूण २४ कोटी ८२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज सील करून ताब्यात घेतला होता.या कारवाईने राज्यातील सहकार वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.


*अबब.. ७३ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर गुन्हा

मालेगाव बाह्य मतदारसंघासाठी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम असताना या कार्यक्रमासाठी ३३१ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली होती.यापैकी ७३ बीएलओंनी निवडणूक यादी कामाकडे पाठ फिरविली आहे. या प्रकाराची तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी गंभीर दखल घेत संबंधित बीएलओंविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला होता.


*'त्या' चिमुकल्यावर स्व: खर्चाने केला होता उपचार*

मालेगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देण्याचे काम सुरू असताना दहीवळ येथील आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील ९ वर्षाचा चिमुकला तापाने फनफणला असता तहसीलदार राजपूत यांनी त्याच्या आजीकडे दवाखान्यात नेले नाही का? अशी चौकशी केली असता पैसे नसल्याचे सांगताच तहसीलदार राजपूत यांनी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात  त्या मुलाला उपचारासाठी दाखल केले. चार दिवस रुग्णालयात मुलगा उपचार घेत असताना वेळोवेळी तहसीलदार राजपूत भेट देऊन तब्येतीच चौकशी करत असत. डिस्चार्ज वेळी संपूर्ण बिल तहसीलदार राजपूत यांनी अदा करून त्या मुलाला सुखरूप घरी पोहोच केले. सामाजिक दायित्व जोपासणाऱ्या कार्याची सर्वांनीच वाहवा केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत