देवळाली प्रवरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व देवळाली प्रवरा नगरपरिषद  यांच्या संयु...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व देवळाली प्रवरा नगरपरिषद  यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.


  यावेळी शहरात  वृक्षवाटप करण्यात आले.या साठी  नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी अजित निकत यांचे मोलाचे  योगदान लाभले.


यावेळी  प्रमोद जाधव  व पोलीस उपनिरीक्षक  संदीप  संसारे  यांचा  सत्कार कारण्यात आला.

 देवळाली शहरात झेंडा मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शेतकरी पुतळा येथे केक कापून आणि मिठाई  वाटून जयंती साजरी करण्यात आली. सर्व गावकऱ्यांना सुरुची भोजन देण्यात आले. विद्युत रोषणाईसह डीजेच्या निनादात भव्य मिरवणूक  काढण्यात आली.


या कार्यक्रमासाठी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष शगणेश दादा भांड, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, मुख्याधिकारी  अजित निकात, सुदर्शन जवक,  एकलव्य संघटनेचेअध्यक्ष शिवाजीराव ढवळे, शिवसेनेचे दत्ता कडू, आरपीआय अहमदनगर जिल्हा अध्यक्ष  सुरेंद्र  थोरात, माजी नगरसेविका सुनीता थोरात, नगरसेवक शैलेंद्र कदम, विश्वास  पाटील, आदिनाथ कराळे,पत्रकार रफिक शेख, गीताराम शेटे,मराठा ग्रुपचे अध्यक्ष दासू पठारे, वैभव गिरमे, बाबासाहेब पंडित, स्वप्नील फ्रान्सिस संसारे,  किशोर  पंडित आदिंसह सर्व वाड्या वस्तीवरील, राजवाडा परिसरातील भिमसैनिक उपस्थित होते.


कार्यक्रमचे सूत्रसंचालन संदीप पंडित यांनी केले तसेच आभार  सचिन रणधीर यांनी मानले.


सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राकेश संसारे, रोहित पंडित, सागर  संसारे, सागर पंडित, रवी  शिंदे, सचिन  रणधीर, शंकर धोत्रे, अमित पंडित , संदीप पंडित  यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सेंट मेरी युवक  मंडळ, राजवाडा, आदर्श मित्र मंडळ, लाख  रस्ता यांचे विशेष सहकार्य लाभले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत