वांबोरी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वांबोरी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

राहुरी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जयंती उ...

राहुरी(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जयंती उत्सवसमितीच्यावतीने विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले.


प्रारंभी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष व युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच किरण ससाणे, राधिका क्लॉथचे सुयोग बिहाणी, सागर शर्मा, डॉ.योगेश पानसरे आदी उपस्थित होते.


यावेळी वांबोरी परिसरातील नागरिकांच्या हाडांची मोफत तपासणी डॉ.सूरज महाडिक, डॉ.सागर जवरे, डॉ.सचिन तोडमल यांनी केली. असंख्य रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला.


  वांबोरी गावातील  सिद्धी संतोष माळवदे या कन्येने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी रेखाटली. आकर्षक रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.



  या कार्यक्रमास माजी सरपंच किसन जवरे, नितीन बाफना, प्रशांत नवले आदी उपस्थित होते.


 कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य सूरज मकासरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे,  रिपब्लिकन सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष भरत भांबळ, युवा महासचिव अमोल मकासरे, आतिष मकासरे, कमलाकर भांबळ, संदीप सत्रे, मेघराज सत्रे, सुनील मकासरे मिस्त्री आदिंसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत