विद्यार्थी आधार कार्ड संबंधित काम व क्षमता वाढवुन सेवा सुरळीत करा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विद्यार्थी आधार कार्ड संबंधित काम व क्षमता वाढवुन सेवा सुरळीत करा

  लोहोनेर(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने शाळेतील विद्यार्थी पटसंख्येनुसार संबंधित विद्यार्थ्यांचे आधार कार्ड करण्याचे आदेश द...

 लोहोनेर(प्रतिनिधी)



महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने शाळेतील विद्यार्थी पटसंख्येनुसार संबंधित विद्यार्थ्यांचे आधार कार्ड करण्याचे आदेश दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यंत दिले आहेत. या कामासाठी राज्यातील बहुसंख्य शिक्षक बंधू-भगिनी कार्यरत आहेत. परंतु सदरच्या कामासाठी लागणारे आधार कार्ड चे सर्व नियमितपणे काम करीत नाही. आता तर आठ दिवसापासून या सर्वची साईट बंद झालेली आहे.



 वास्तविकता शाळा स्तराच्या प्रारंभीच स्टुडन्ट पोर्टलवर प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती भरली आहे. ही माहिती भरत असताना पालकांकडून आलेले आधार कार्ड लिंक होत असते सदरचे आधार कार्ड पालकांकडून आलेले असते त्यात काही विद्यार्थ्यांचे शालेय कार्यालयातील नाव जन्मतारीख व अंगठ्याचे ठसे यामध्ये फरक जाणवत असल्याने त्यांचे आधार कार्ड लिंक होत नव्हते म्हणून शाळांकडून विद्यार्थ्यांचे बोनाफाईड सर्टिफिकेट देऊन त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट साठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. तसेच अपडेट झाल्यानंतर तो विद्यार्थी व्हॅलीड करायचा आहे. परंतु या कामासाठी लागणारे सर्व ची सेवा नियमित नाही म्हणून सदरचे काम बंद पडलेले आहे. शासनाचा बोगस विद्यार्थी शोधण्याचा शोधण्याचा उपक्रम अतिशय चांगला आहे. परंतु आज रोजी खरे विद्यार्थी या तांत्रिक अडचणीमुळे होतील की नाही. याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच या कामासाठी ची मुदत ३० एप्रिल अखेर पर्यत आहे. याबाबत राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी हे काम म्हणजेच आधार कार्ड संबंधीचे काम हे केंद्र सरकार अंतर्गत आहे असे सांगितले. तरी याबाबत केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून खरा विद्यार्थी अन्यथा विद्यार्थी व्हॅलिडीट झाला नाही तर राज्यात अतिरिक्त शिक्षक यांचा प्रश्न निर्माण होईल कारण व्हॅलिड विद्यार्थी पटसंख्येनुसार संच मान्यता होणार आहे. व या संचमान्यतेवर शिक्षकांची संख्या ठरणार आहे तरी याबाबत योग्य ती कार्यवाही होऊन आधार संबंधीचे काम व त्यासंबंधीचे सर्व याची क्षमता वाढवून व त्या सेवा नियमित करून द्याव्यात विनंती आबासाहेब शिंदे यांनी केली आहे. 


याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना ही समस्या लक्षात आणून दिली असून त्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन ही समस्या मार्गी लावण्याची आश्वासन दिले तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार भारतीताई पवार यांनाही निवेदन देऊन या समस्येबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. याबाबत ना. भारती पवार यांनी पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा पक्ष मार्गी लाव असे आश्रासन दिले.


यावेळी आबासाहेब शिंदे यांचे समवेत श्रीमती विजयाताई मोगल, शीतल पाटील, विनीत पवार, वैभव पाटील, शरद बच्छाव, शरद सोनवणे, प्रकल्प पाटील, नानासाहेब काकड, ज्योत्स्ना पाटील, स्वाती पानगव्हाणे, आदी शिक्षक बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत