जेष्ठ शिवसैनीकांना संपर्क करा, त्यांचा आत्मसन्मान जपा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जेष्ठ शिवसैनीकांना संपर्क करा, त्यांचा आत्मसन्मान जपा

देवळाली प्रवरा(वेबटीम)  माजी मुख्यमंत्री ,पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाकाळात जे काम केले.त्याकाळात अंत्यत संयमाने परिस्थिती हाताळ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



 माजी मुख्यमंत्री ,पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाकाळात जे काम केले.त्याकाळात अंत्यत संयमाने परिस्थिती हाताळली.ते दिवस महाराष्ट्रातील जनता कदापी विसरणार नाही.सर्वबाजुने जाणीपुर्वक   कोंडी न् बदनामी करत शिवसेना पक्ष संपविण्याचा निंद्य प्रकारामुळे  महाराष्टा्तील जनता प्रचंड चिडलेली आहे.त्यातुन उध्दवसाहेंबाविषयी प्रचंड सहानभुती निर्माण झाली आहे.ती सहानभुती मतदार रुपांतरीत करण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. असे राहुरी तालुका संपर्कप्रमुख श्री चंद्रभान चिकने यांनी केले. 



     आज देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरातील ठाकरे गटाचे शिवसेना पक्षाचा कार्यकर्त्याची बैठक आराध्या कॅाम्प्लेक्रमध्ये पार पडली.त्यावेळी श्री चंद्रभान चिकणे बोलत होते. 

       यावेळी जेष्ठ शिवसैनीकांना समक्ष भेटुन त्याचा आदर करत त्यांना पक्षाचे कामासाठी पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करणे.तसेच नवीन लोकांना पक्षात घ्यावे. पक्ष संघटन मजबुत करण्याच्या सुचना त्यांनी उपस्थितीत शिवसैनीकांना दिल्या. 

      यावेळी श्री दत्ता कडु पाटील, भागवत मुंगसे यांनी आपले विचार प्रगट केले. पक्षबांधणी नव्या जोमाने करावी.तसेच मार्केट कमेटी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. सध्याचे काळात आपलाच पक्ष या आव्हांनाचा स्वीकार करुन पुर्ण करेल.येणारा पुढचा काळ आपलाच राहिल. त्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत. असे सर्वानुमते ठरले. 

    यावेळी देवळाली शहरप्रमुख श्री अनिल चव्हाण यांनी श्री चिकने यांचा सत्कार केला. यावेळी राहुरी तालुका प्रमुख सचीन म्हसे,विजय शिरसाठ , राहुरी कारखाना शहरप्रमुख श्री विजय गव्हाणे, बाबाखंडागळे टेलर , विजय कुमावत , रोहित खंडागळे, चंद्रकांत दोंदे , युवा सेना प्रमुख श्री देठे , श्री वाळुंज ,सेवानिवृत्त शिक्षक श्री झावरे गुरुजी,श्री बशीर पठाण आदिंसह शिवसैनीक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत