राहुरी फॅक्टरीचे वृक्षमित्र प्रितेश तनपुरे यांना छत्रपती पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीचे वृक्षमित्र प्रितेश तनपुरे यांना छत्रपती पुरस्कार

राहुरी(प्रतिनिधी) छत्रपती प्रतिष्ठानचे या वर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात येत असून,९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्का...

राहुरी(प्रतिनिधी)



छत्रपती प्रतिष्ठानचे या वर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात येत असून,९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष दीपक पंडित, उपाध्यक्षा विद्या करपे यांनी दिली. राहुरी फॅक्टरी येथील वृक्षमित्र प्रितेश दिलीप तनपुरे यांना वृक्षमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


 शासनाकडून ट्वेल ए, एटिजी, सीएसआर नोंदणी प्राप्त उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठान दरवर्षी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींचा पुरस्कारांनी सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपत आहे. यावर्षी ९ एप्रिल रोजी राज्याचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या हस्ते, तसेच आमदार शंकरराव गडाख, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके, जिल्हा संपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे,तनपुरे कारखाना चेअरमन नामदेवराव ढोकणे, प्रा दत्तात्रय अडसुरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, बीड व नगर जिल्ह्यातील अशाच काही प्रतिभावंत व्यक्तींच्या पुरस्कार वितरणातून हा वसा पुढे नेत आहे.                  



   पुरस्कारांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातून डॉ अभिजित पाठक, कृषी - शिवाजीराव डोळे, पर्यावरण - दुर्गाताई तांबे, महिला सबलीकरण - अनुराधा  नागवडे, विधिज्ञ अजिंक्य काळे, पोलीस प्रशासन पीआय अनिल कटके,  बेस्ट पॉलिटिकल विश्लेषक - संदीप रोडे,  शोध पत्रकारिता : बाळासाहेब सोनवणे ,  ह्युमन मीडिया  स्टोरी- सुनील भोंगळ , कृषिकन्या - विनया बनसोडे,  युवा आयडॉल- अक्षय शिवाजीराव कर्डीले,  उद्योजक - अमृतराव रसाळ, कृषिमित्र - सचिन ठुबे, वृक्षमित्र - प्रितेश तनपुरे,  सामाजिक- प्रदीप करपे, क्रीडा- अच्युत थोरात,  साहित्यिक - सायमन भारस्कार,  आदर्श ग्रामसेवक - मुरलीधर रगड,- धार्मिक ट्रस्ट नानासाहेब आढाव,  आदर्श पोलीस पाटील- विशाल पवार,सहकार- दिलीपराव आघाव, शैक्षणिक -प्रमिला कोठुळे अशी नावे आहेत. पुरस्कार वितरणानंतर समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होईल, पुरस्कार प्राप्त सर्वांचे जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत