आ.आशुतोष काळे यांनी चांदेकसारेसाठी भरभरून दिले- चव्हाण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आ.आशुतोष काळे यांनी चांदेकसारेसाठी भरभरून दिले- चव्हाण

कोपरगाव(वेबटीम) चांदेकसारे गावावर सतत काळे कुटुंबाचे प्रेम राहिले आहे. कर्मवीर शंकरराव काळे त्यांच्यानंतरही तेच प्रेम माजी आमदार अशोक काळे व...

कोपरगाव(वेबटीम)



चांदेकसारे गावावर सतत काळे कुटुंबाचे प्रेम राहिले आहे. कर्मवीर शंकरराव काळे त्यांच्यानंतरही तेच प्रेम माजी आमदार अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी कायम ठेवत काळे कारखान्याच्या संचालक बोर्डासह मिनी आमदार म्हणून ओळख असलेले सभापती पदही चांदेकसारे गावाला त्यांनी बहाल केले होते. त्यांनी चांदेकसारेला भरभरून दिले असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण यांनी केले.



चांदेकसारे येथील मातोश्री निवासस्थानावर गौतम बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झालेल्या बापूराव जावळे व बापूराव वक्ते ,व पवार पत्रकार यांचा सत्कार करताना ते बोलत होते.यावेळी काळे कारखान्याचे माजी संचालक नारायणराव होन, निळकंठ होन, रावसाहेब होन, संजयलाला होन, उपसरपंच सचिन होन, विलास चव्हाण, तुळशीदास होन, किरण होन, राजेंद्र होन, शरद होन, कल्याण गुरसळ, कर्णा चव्हाण, सतीश खरात, अदी उपस्थित होते.चांदेकसारे येथे आपल्या आजोळी  गौतम बँकेचा संचालक म्हणून सत्कार झाल्याने बापूराव जावळे भरून गेले तर बापूराव वक्ते यांनाही या सत्काराने ऊर्जा मिळाली.रावसाहेब होन यांनी सांगितले की समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला मानाचं पद मिळाला तर तो आनंद वेगळा असतो. त्यांचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून गौतम बँकेच्या संचालक पदी वर्णी लागलेल्या बापूराव जावळे , बापूराव वक्ते व पत्रकार पवार यांचा सत्कार केला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण होन यांनी केले तर आभार संजयलाला होन यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत