समृद्धी महामार्गावरील सर्व्हिस रोडलगत मालवाहतूक पिकअप विहिरीत पडल्याची घटना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

समृद्धी महामार्गावरील सर्व्हिस रोडलगत मालवाहतूक पिकअप विहिरीत पडल्याची घटना

  चांदेकसारे (वेबटीम)  तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्ग लगत सर्विस रस्त्याने जाणारी मालवाहतूक पिकअप एम एच १७ ए जे ...

 चांदेकसारे (वेबटीम)



 तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्ग लगत सर्विस रस्त्याने जाणारी मालवाहतूक पिकअप एम एच १७ ए जे ५८३६ या गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून भिषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता घडली, दरम्यान गाडीचा ब्रेक फेल झाल्याची बाब चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने वाहनातून उडी मारली मात्र त्याचा मदतनीस गाडी होता.यात मदतणीसाचा मृत्यू झाल्याची अंदाज आहे.घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून गाडी विहिरीतून काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्विस रस्त्याने जाणारी एम एच १७ ए जे ५८३६ या पिकअप गाडीचा

ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून भिषण अपघात झाला. चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने वाहनातून उडी मारली मात्र त्याचा मदतनीस गाडी होता.यात मदतणीसाचा मृत्यू झाल्याची अंदाज असून अपघाताची माहिती मिळताच 

सरपंच संजय गुरसळ, पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड,शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक सुधाकर वक्ते,प्रा.मधुकर वक्ते,विक्रम वक्ते, सागर होन, सुनिल होन ,समुद्धीचे अधिकारी, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे घटना स्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी तात्काळ

समृद्धी महामार्गाची रेस्क्यू टीम,महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल, अग्निशामक दल, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी -कर्मचारी,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना पाचारण करून गाडी विहिरीतुन काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, रात्री १० वाजेच्या दरम्यान गाडी विहिरीतून 

बाहेर काढली मात्र मयत इसमाचा शोध सुरू असून 

त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम चालू आहेत.तर चालकाला संत जनार्दन हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहे.या घटनेची माहिती वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच एकच खळबळ उडाली असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस तपास करत असून रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत