...त्या मंडळाला डीवायएसपी मिटके देणारे १० हजार रुपयांची पुस्तके बक्षीस - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

...त्या मंडळाला डीवायएसपी मिटके देणारे १० हजार रुपयांची पुस्तके बक्षीस

राहुरी(वेबटीम) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे सर्वसमाजाला दिशा देणारे आहेत.त्यामुळे विविध सामाजिक उपक्रम राबवून महामानव डॉ.आंबेडकर यांच...

राहुरी(वेबटीम)



डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे सर्वसमाजाला दिशा देणारे आहेत.त्यामुळे विविध सामाजिक उपक्रम राबवून महामानव डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी करून शांततेत जयंती साजरी करणाऱ्या मंडळास १० हजार रुपये किंमतीचे डॉ.आंबेडकर यांची पुस्तके स्वतः बक्षीस म्हणून देणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.


राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी शांतता कमिटी बैठक पार पडली. यावेळी पोलीस उपअधीक्षक मिटके बोलत होते. यावेळी तहसीलदार एफ.आर.शेख, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे उपस्थित होते.


यावेळी तहसीलदार शेख बोलताना म्हणाले की, राहुरी शहर व परिसरातील गावांत दरवर्षी अगदी शांततेत भीमजयंती साजरी होते. यंदाही सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करून शांततेत मिरवणूक व इतर कार्यक्रम संपन्न करावे. सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यासाठी राहूरीतील विविध पक्ष, संघटना व मित्र मंडळ नेहमी पुढे असतात. कोरोना काळात या सर्वांनी भरपूर योगदान दिले असून डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजीक उपक्रमांवर भर द्या असे आवाहन त्यांनी केले.


पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे म्हणाले की, डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने  गडबड गोंधळ न करता शांततेत मिरवणूक काढाव्यात. झेंडे लावताना ते उंचीवर लावावेत जेणेकरून विटंबना होऊन कुठलाही वाद निर्माण होणार नाही.बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सर्वांनी सहकार्य करून राहुरी तालुक्यात आदर्श भीमजयंती साजरी करूया असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलीस चारुदत्त खोंडे, पोलीस उपनिरीक्षक आसिफ शेख, पोलिस कर्मचारी अशोक शिंदे, श्री. ताजणे, श्री. रोहोकले, आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे, आरपीआय आंबेडकर गट तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव अनिल जाधव, जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, तालुकाध्यक्ष संतोष चोळके, शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, आरपीआय तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्नेहल सांगळे, शहराध्यक्ष बबन साळवे, पापभाई बिवाल,  वंचित देवळाली शहराध्यक्ष साईनाथ बर्डे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत