वाट चुकलेल्या परराज्यातील मनुष्यासाठी देवळाली प्रवरातील अपंग 'संदीप'ने केले असे काही.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वाट चुकलेल्या परराज्यातील मनुष्यासाठी देवळाली प्रवरातील अपंग 'संदीप'ने केले असे काही..

देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील प्रहार सैनिक बोरसे यांनी रस्ता चुकलेल्या परराज्यातील व्यक्तीला आधार देऊन घरापर्यंत सुखरूप  पोहोच...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा येथील प्रहार सैनिक बोरसे यांनी रस्ता चुकलेल्या परराज्यातील व्यक्तीला आधार देऊन घरापर्यंत सुखरूप  पोहोचविण्यासाठी मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.


 देवळाली प्रवरा येथे  एका हाताने अपंग असलेले प्रहार सैनिक संदिप बोरसे यांचा सोसायटी डेपो येथे कृष्णा फुटाणा व खारा शेंगदाणा विक्रीचा  स्टाॅल आहे. संदिप बोरसे नेहमीप्रमाणे गिऱ्हाईक  करत असताना त्यांची नजर  जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर नजर गेली . त्यावेळी संदीप यांना सदर व्यक्तीकडे निरखून बघितले असता  हा मनुष्य आपल्या गावातील अथवा आसपासचा देखील नसल्याचे जाणवले. संदीप यांनी आस्थेने सदर मनुष्याची  तचौकशी केली असता ,  रस्ता चुकलो असून मी मध्यप्रदेश येथील आहे. माझ्याकडे पैसे नाही.आणि मी गावात चार दिवसापासुन फिरत असल्याचे सांगितले.




 त्यानंतर संदीप बोरसे यांनी  प्रहार दिव्यांग संघटना अहमदनगर  सल्लागार सलीमभाई शेख यांना फोनवरून रात्री अशी व्यक्ती आहे.तिला काही मदत करता येईल का याबाबत विचारणा केली., त्यावर सलिम शेख यांनी मी लगेच येतो असे सांगितले. त्यावर संदीप बोरसे यांनी तुम्ही आता येऊ नका, मी त्या व्यक्तीला जेवू घालतो, तुम्ही सकाळी या असे सांगितले. बोरसे यांनी सदर भोपाळ येथील मनुष्याला जेवण दिले त्याला आधार दिला.


 संदिप बोरसे यांनी सदर मनुष्याला तूमच्याकडे तुमच्या घरच्यांचा फोन नंबर आहे का ? तुमचे नाव असे अनेक प्रश्न आपुलकीने विचारून संवाद साधला. त्यावर त्या व्यक्तीने घरच्यांचा नंबर देऊन माझे नाव धनसींग संरगसीग काकोरीया रा.बाया तालुका रेहटी, जिल्हा सियार(मध्यप्रदेश) असे सांगितले.


प्रहार दिव्यांग संघटना अहमदनगर उतर जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख , उतरचे जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. सदर मध्यप्रदेश येथील मनुष्य  मला घरी जायचे आहे, मला मदत करा अशी विनवणी करत होता. त्यानुसार संदीप बोरसे व प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार सदर मनुष्याच्या अंगावरील कपडे बदलून वाढलेली दाढी करण्यासाठी आर्थिक मदत दिली. त्हरवलेल्या त्या मनुष्याला खूप आधार वाटला. याचवेळी प्रहारच्या संदीप बोरसे व प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी सदर मनुष्याच्या घरी संपर्क करून तुमचे धनसींग आमच्या सोबत सुखरूप आहे, त्यांना घरी येण्याची खूप इच्छा आहे.तुम्ही त्यांना नेण्यासाठी श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवर या व आम्हाला संपर्क करा असे सांगितले. त्यानुसार वाट चुकलेल्या धनसींग यांचा पुतण्या श्रीरामपुरला आल्यानंतर त्यांनी धनसिंग यास पुतण्याकडे सुपूर्त केले. यावेळी धनसींग याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. अगदी स्मित हास्य करत त्याने जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, प्रहार सैनिक संदिप बोरसे, प्रहार सैनिक रमेश गुलदगड यांना बाय बाय केला. तो सुखरूप घरीही पोहचला आहे.



 देवळालीत फुटाणे-शेंगदाणे विक्री करणाऱ्या संदीप बोरसे यांनी व आपल्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने केलेल्या सामाजिक कार्याची सर्वत्र चर्चा होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत