कै.पोपटराव पाटील संस्थेच्या अध्यक्षपदी- जंगले उपाध्यक्षपदी- काकडे बिनविरोध निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कै.पोपटराव पाटील संस्थेच्या अध्यक्षपदी- जंगले उपाध्यक्षपदी- काकडे बिनविरोध निवड

पानेगाव (बाळासाहेब नवगिरे) नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील नामदार शंकरराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली तालुक्यात अग्रगण्य असणाऱ्या कै....

पानेगाव (बाळासाहेब नवगिरे)



नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील नामदार शंकरराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली तालुक्यात अग्रगण्य असणाऱ्या कै. पोपटराव पाटील संस्थेची  २०२३ते०२८ पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध पार पडली. 


निवडणूक निर्णय अधिकारी एन के वनवे, सह्हायक निवडणूक निर्णय अधिकारी एस व्ही ठोंबरे यांनी बोलावलेल्या  नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष निवड संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.यावेळी अध्यक्षपदासाठी ज्ञानेश्वर सोपान जंगले यांना सुचक ताराचंद घोलप अनुमोदक अनिकेत जंगले उपाध्यक्षपदासाठी दादासाहेब काकडे यांना सुचक बाळासाहेब जंगले अनुमोदक गुलाब गायकवाड हे होते.दोन्ही पदासाठी एक एक अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एन के वनवे यांनी जाहिर केले.


यावेळी संस्थापक मुळाचे संचालक, लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले नुतन जेष्ठ संचालक बबनराव जंगले, अनिल जंगले, हितेश जंगले, संजय पवार,संध्या गुडधे वच्छालाबाई गागरे, जनाबाई जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप, उपसरपंच रामराजे जंगले, भारत जंगले, द्वारकानाथ चिंधे, भाऊसाहेब काकडे,रघूनाथ जंगले, ग्रामविकास अधिकारी संभाजी दौंड, रमेश जंगले, शिवाजी जंगले तानाजी घोलप, सतिश जंगले, गणेश जंगले, संपत गुडधे, बाळासाहेब जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे बाबासाहेब शेंडगे, राहुल जंगले, डॉ काकडे डॉ तुवर मच्छिंद्र जंगले, विठ्ठल गागरे, निवृती जंगले, नानासाहेब जंगले, काकासाहेब जंगले सुनिल सोनवणे, श्रीकांत जंगले,दिलीप गुडधे,गिताराम जंगले आदींसह मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे संस्थापक संजय जंगले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जेष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील, नामदार शंकरराव गडाख पाटील, लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सुरू असून सलग पंचवीस वर्षांपासून संस्थेची निवड बिनविरोध होत असून हा सभासदांचा मोठेपणा आहे.


 संस्थेचा लोकाभिमुख कार्यासाठी प्रत्येकाचे योगदान आहे. प्रथमच मोठ्या प्रमाणावर युवकांना संधी दिल्याने युवक वर्गातून समाधान व्यक्त होताना दिसत आहे. सुत्रसंचालन- संदिप जंगले यांनी केले.प्रास्तविक बाळासाहेब नवगिरे आभार संस्थेचे सचिव ए पी बोर्डे मानले. नुतन अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळाचे अभिनंदन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील लोकनेते सुनिल गडाख,युवा नेते उदयन गडाख यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत