सात्रळ येथे सौ. शालिनीताई विखे यांच्या हस्ते "आनंदाचा शिधा "वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ येथे सौ. शालिनीताई विखे यांच्या हस्ते "आनंदाचा शिधा "वाटप

सात्रळ(वेबटीम) येथील सात्रळ ग्रुप  विविध कार्य. सोसायटी तर्फे चालविण्यात येत असलेल्या स्वस्त धान्य  दुकानात  राज्य सरकारच्या  योजनेअंतर्गत  ...

सात्रळ(वेबटीम)



येथील सात्रळ ग्रुप  विविध कार्य. सोसायटी तर्फे चालविण्यात येत असलेल्या स्वस्त धान्य  दुकानात  राज्य सरकारच्या  योजनेअंतर्गत  "आनंदाचा  शिधा "वाटप जिल्हा  परिषदच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई  विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य   सरकारने सामान्य  जनतेसाठी  अनेक योजना राबविल्या  असून, सणासुदीसाठी  लाभार्थींना  "आनंदाचा शिधा " वाटप   ही एक योजना  असून लाभार्थी ला त्यामध्ये  साखर, डाळ,गरा,  तेल अश्या  वस्तूंचे वाटप अल्पदरात केले जात आहे. 


कार्यक्रमात   सोसायटी  चे जेष्ठ सदस्य  ऍड. अप्पासाहेब  दिघे यांनी सोसायटी  च्या कारभाराची माहिती नमूद केले तसेच सात्रळ ग्रुप सोसायटी च्या संचालक मंडळातर्फे  सौ. शालिनीताई  विखेंचा सत्कार संस्था चे अध्यक्ष  ऍड. बाळकृष्ण  चोरमुंगे यांच्या हस्ते  करण्यात आला. या प्रसंगीविखे कारखान्याचे उपाध्यक्ष  विश्वासराव कडू, जे. पी. जोर्वेकर,  सात्रळ ग्रुप सोसायटी  चे संचालक  दिलीपराव डुक्रे , वसंतराव  डुक्रे पाटील, सोसायटी  चे उपाध्यक्ष अतुल ताठे,सुभाष  कारभारी  दिघे, विलास दादा घोलप, गोरक्ष घोलप, संजय  नागरे, प्रकाशराव  ताठे, सौ. उज्वला विजय  डुक्रे, सौ. मंदाकिनी  दिलीप  डुक्रे, चांगदेव  पडघलमल, ऍड. सुभाष चोरमुंगे, तुळशीराम  शिंदे, विखे  कारखाना  संचालक  बाबुराव  पडघलमल, बिपीन ताठे, दिलीप म्हैसकर, विनोद कुलकर्णी   तसेच ग्रामस्थ, लाभार्थी  मोठया संख्येने  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत