श्रीरामपूर(वेबटीम) तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.शा...
श्रीरामपूर(वेबटीम)
तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.शालेय परिसरात काढलेल्या मिरवणुकीत विद्यार्थी,शिक्षक व पालक उत्साहाने सहभागी झाले होते.
![]() |
छत्रपती शिवाजी महाराज की जय....जय भवानी जय शिवाजी... या घोषणांनी शालेय परिसर दुमदुमून गेला.विद्यार्थ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज,जिजामाता,मावळे यांच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे होते.यावेळी गावचे पोलीस पाटील राजेंद्र राशिनकर,शिक्षण प्रेमी ग्रामस्थ प्रमोद भवार, सुभाष तुपे,किरण दातीर,सुनिल दातीर,शैलेश खाटेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविकातून शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी शिवजयंतीचे महत्व विशद केले.शिवजयंती निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व गीतामधून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सुंदर विचार मांडले.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी पोलीस पाटील राजेंद्र राशिनकर यांनी मुलांना खाऊसाठी बक्षीस दिले.
पालक किरण दातीर यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती देऊन शाळेत शिवजयंती कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले.कार्यक्रमात ३० पर्यंत पाढे पाठ करणारा विद्यार्थी कृष्णा रविंद्र लांडे याचा सत्कार करण्यात आला.शेवटी सहशिक्षिका सुजाता सोळसे यांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत