पानेगांव (वेबटीम) नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे दि.२२रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे घरकुल मंजूर वाटप प्रमाणपत्र गृह उत्सव सोहळ्या...
पानेगांव (वेबटीम)
नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे दि.२२रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे घरकुल मंजूर वाटप प्रमाणपत्र गृह उत्सव सोहळ्यात माजी लोकायुक्त सरपंच संजय पाटील जंगले प्रमुख अतिथी म्हणून बोलतं होते.
अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच निकीता भोसले /आंबेकर होत्या.
जंगले यांनी यावेळी सांगितले की, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२ पानेगांव येथील ६३ घरकुल लाभार्थींना प्रमाणात वाटप करण्यात आले तसेच पंधरा हजार रुपये लाभार्थींचा खात्यात जमा पण झाले असून घरकुल काम करताना दर्जेदार तसेच वेळेत पुर्ण करावे. त्याच बरोबर राहिलेल्या लाभार्थी यांनी सविस्तर फाॅर्म भरून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावे. घरकुला पासून गरीब वंचित राहणार नाही.यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचं जंगले यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विष्णू दहिफळे, सागर आंबेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय जंगले, ग्रामपंचायत सदस्य रमेश जंगले,ज्ञानेश्वर जंगले,संकेत गुडधे, सुर्यभान गुडधे,नारायण जंगले,दिगंबर जाधव, संदिप जंगले, नानासाहेब गुडधे,अमोल लांघे, उत्तम तांबे, नारायण तांबे,शरद जंगले, अरुण गुडधे, शुमभ जंगले,आण्णासाहेब जाधव, दत्तात्रय शिंदे, मोहनराव जंगले, सुनील जंगले, अमोल जंगले, प्रविण सोनवणे,गणेश गायकवाड सुनिल चिंधे बाबासाहेब शेंडगे, विलास जंगले, सोपान जंगले,आसाराम जंगले, बाळासाहेब गुडधे, मुकुंद घोलप,आदींसह महिला लाभार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रस्ताविक ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी घरकुल काम तसेच बांधकाम टप्प्या पुर्ण झाले अनुदान व लाभार्थी कडे जागा उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था शासनाकडून जागा घेण्यासाठी अर्थिक मदत आदी बाबत माहिती देवून शासन स्तरावरून ऑनलाइन कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवरुन लाभार्थींना दाखविण्यात आला.
नेवासे पंचायत समितीच्या वतीने कृषी विभागाचे अधिकारी रखमाजी लांडे उपस्थित होते.आभार - ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर जंगले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत