राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील चैतन्य वारकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थीनी ह.भ.प ऋतुजा साबळे हिच्या कीर्तनात भाविक...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील चैतन्य वारकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थीनी ह.भ.प ऋतुजा साबळे हिच्या कीर्तनात भाविक तल्लीन झाले आहेत.
राहुरी येथील काळे आखाडा परिसरातील जगधनी मळा येथील शिवसाई मंदिरात विजया एकादशीनिमित्त ऋतुजा साबळे यांचे किर्तन पार पडले.यावेळी मृदुंगावर गोपीनाथ वर्पे व चैतन्य वर्पे यांनी साथ केली. चैतन्य वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या टाळाच्या साथसंगतीमुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
यावेळी ह.भ.प बाळकृष्ण महाराज खांदे, डॉ.सुभाष जगधनी, पांडुरंग खांदे व भाविक भक्तगण उपस्थित होते. चैतन्य वारकरी शिक्षण संस्थेत असंख्य विद्यार्थी गोपीनाथ वर्पे व ज्योती वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मिक व संगीत शिक्षणाचे धडे घेत आहेत.,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत