देवळाली प्रवरा/वेबटीम:- श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत उद्या शनिवार दि.२२ फेब्रुवार...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत उद्या शनिवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता देवळाली प्रवरा शहरातील समर्थ बाबुराव पाटील सांस्कृतिक भवन येथे शासकीय आढावा बैठक संपन्न होणार आहे.
या बैठकीत आमदार ओगले हे देवळाली प्रवरासह ३२ गावातील नागरिकांच्या अडचणी,प्रश्न समजावून घेणार आहेत.
या बैठकीसाठी तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, गटविकास अधिकारी सुदर्शन मुंढे, मुख्याधिकारी विकास नवाळे तसेच वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा,स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महावितरण विभाग आदींसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
या बैठकीसाठी देवळाली प्रवरांसह ३२ गावातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आ. हेमंत ओगले यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत