श्रीरामपूर(वेबटीम) महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी आमदार माजी आमदार लहू कानडे यांची नियुक्ती करण्यात ...
श्रीरामपूर(वेबटीम)
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी आमदार माजी आमदार लहू कानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल नियुक्ती केली आहे.लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.पक्ष वाढीसाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न कराल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आ.लहू कानडे यांना ताकद दिली जात असून त्या दृष्टीने पक्षाच्या महाराष्ट्र परदेश वरीष्ठ उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
या निवडीबद्दल माजी आ.कानडे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
निवडीनंतर बोलताना माजी आ.कानडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मोठा विश्वास टाकून मला अजित पवार यांनी उमेदवारी दिली.महायुतीच्या सर्व नेत्यांनी सर्वोतोपरी सहकार्य केले.दुर्देवाने पराभव झाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पराभवानंतर भेट घेतली असता खचून न जाता पुन्हा कामाला लागा, संघटन वाढवा, मतदारसंघातील विकास कामासाठी निधी देण्यास मी कटिबद्ध राहील असा शब्द दिल्यानंतर मतदारसंघात शाखा वाढीसाठी काम सुरू आहे. कामाची दखल घेऊन पक्षाने वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.निश्चित या पदाच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी व पक्षाचे विचार तळागाळापर्यंत नेण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत