राहुरी फॅक्टरी(फॅक्टरी) राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झा...
राहुरी फॅक्टरी(फॅक्टरी)
राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
महादेव मंदिरात सकाळी महारुद्राभिषेक संपन्न झाला.त्यानंतर आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम व सौ.सुजाता कदम यांच्यावतीने खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. सामूहिक शिवलीलामृत अध्याय ११चे पठण, राम रक्षा पठण व भक्तीगीत कार्यक्रम व महाआरती संपन्न झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशील गोसावी, मनोज जाधव, कृष्णा कदम, यश आहेर, निलेश कुऱ्हाडे, सुदर्शन वाळे, रवींद्र आवटे, सुनील जमदाडे, सुमित शिंदे, श्री,कासार, श्री.सोनवणे यांनी अथक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत