राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कणगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरघुडेवस्ती येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कणगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरघुडेवस्ती येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांची, प्रतिमापूजन,आरती, विद्यार्थी भाषणे, शिवगीतगायन, शिवगर्जना, लेझीम पथक सादरीकरण, घोड्यांचे नाचकाम असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
साहेबराव मुरलीधर वरघुडे यांनी सर्वांना सुरुची भोजन दिले. मंडप सौजन्य संतपराव भुजाडी यांनी दिले. श्री.ज्ञानेश्वर गाढे व श्री.भास्करराव मुक्ताजी वरघुडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना भगव्या कॅपचे वितरण केले. तसेच विविध कार्यक्रमातून जवळजवळ ६००० रुपये बक्षीस रूपाने लोकसहभाग जमा झाला.
प्रसंगी कार्यक्रमासाठी जि.प.सदस्य भास्कर गाढे , कणगर गावचे आदर्श सरपंच श्री. सर्जेराव घाडगे उपसरपंच, बाळासाहेब गाढे,व शा. व्य. समिती अध्यक्ष बाबासाहेब वरघुडे,ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा सोसायटीचे सदस्य, माजी विद्यार्थी,पालक बंधू भगिनी, गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत