राहुरी फॅक्टरीतील सोमेश्वर वसाहत येथे महाशिवरात्री उत्सव सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील सोमेश्वर वसाहत येथे महाशिवरात्री उत्सव सोहळा

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर भागातील सोमेश्वर वसाहत येथील श्री महादेव सोमश्वर देवस्थान ट्रस्ट येथे २४ फेब्रुवारी त...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर भागातील सोमेश्वर वसाहत येथील श्री महादेव सोमश्वर देवस्थान ट्रस्ट येथे २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्री उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


 यानिमित्ताने ह.भ.प भारती चंद्रकांत जाधव यांच्या वाणीतून सकाळी ७ ते ११ या वेळेत शिवलीला अमृत पारायण, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.


 उत्सव काळात सोमवार २४ रोजी साई महाराज जाधव, २५ रोजी बाळकृष्ण महाराज खांदे तर २६ रोजी बाबा महाराज मोरे यांची प्रवचन सेवा संपन्न होणार आहे.


गुरुवार २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ.प कृष्णानंद मजाराज यांचे काल्याचे किर्तन व खिचडी महाप्रसादने सांगता होणार आहे. यावेळी संतपूजन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे हे करणार आहे.सप्ताह साठी अन्नदाते व समाजातील विविध दानशूर मंडळी व तरूणांचे सहकार्य लाभत आहे.


 तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत