ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या सात्रळ-सोनगाव सेवाकेंद्र ''तपोवन" मध्ये महाशिवरात्री उत्सव साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या सात्रळ-सोनगाव सेवाकेंद्र ''तपोवन" मध्ये महाशिवरात्री उत्सव साजरा

  सात्रळ(वेबटीम) महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या सात्रळ-सोनगाव सेवाकेंद्र ''तपोवन" मध्ये परमपिता परम...

 सात्रळ(वेबटीम)



महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या सात्रळ-सोनगाव सेवाकेंद्र ''तपोवन" मध्ये परमपिता परमात्मा शिव यांचे दिव्य अवतरणाचे प्रतिक महाशिवरात्री महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. अजन्मा शिव परमपित्या चा दिव्य जन्मदिवस अर्थात अवतरण दिवस केक कटिंग करून साजरा करण्यात आला.



 याप्रसंगी महाशिवरात्रीचे अध्यात्मिक रहस्य कोल्हार सेवा केंद्राचे सहसंचालक राजयोगी शिवाजी भाईजी, यांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले. या पावन पर्वावर शिव ध्वजारोहण करून स्व-परिवर्तनासाठी व विश्वशांतीसाठी शिवध्वजा खाली सात्रळ-सोनगाव सेवाकेंद्र संचालिका राजयोगिनी पद्मावती दीदी यांनी सर्वांकडून प्रतिज्ञा करून घेतली. सदर प्रसंगी या कार्याला बाळकृष्ण चोरमुंगे पा, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश भाऊ गांधी सात्रळ कॉलेजचे प्राचार्य शिंगोटे सर तसेच उपप्राचार्य सिंगारे मॅडम व कानडे यांनी शुभेच्छा दिल्या.

सदर प्रसंगी रंगनाथ महाराज पांडे आबासाहेब कडू पाटील आप्पासाहेब दिघे पाटील सोनगाव ग्रामपंचायत चे मा. सरपंच सुभाष शिंदे,सात्रळ ग्रामपंचायत चे सदस्य रमेश पन्हाळे, शांतीलाल भाऊ गांधी, प्रकाशशेठ वालझाडे, सात्रळ ग्रामपंचायत च्या मा. सरपंच मंगलाताई चोरमुंगे, वैशालीताई व अनिताताई वालझाडे, राजेंद्र बोराडे, शेजवळ सर, आनंद गुरुकुलच्या प्राचार्य अर्चना प्रधान,  मेघना डुक्रे व पंचक्रोशीतले अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. महाशिवरात्रीनिमित्त पंचक्रोशी मध्ये शिव अवतरण हा अंक घरोघर देऊन ईश्वराचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला. ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राच्या शेख बहेन, स्मिता बहेन तसेच निकिता बहेन यांनी सर्वांना कार्यक्रमाची ईश्वरी प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत