राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत महादेव मंदिरात उद्या महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत महादेव मंदिरात उद्या महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील महादेव मंदिरात उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील महादेव मंदिरात उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ३ ते ६ यावेत अभिषेक संपन्न होणार असून दिवसभर खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.


 तर दुपारी ४ ते ५ यावेळेत ताहाराबाद येथील भजनी मंडळाचे भजन तर तर पाच ते सहा या वेळेत ह.भ.प. ओम शांती केंद्राच्या बहनजी यांचे महादेव प्रित्यर्थ अमृतवाणी मधून प्रवचन संपन्न होणार आहे.तसेच सायंकाळी ७ ते ८ या वेळेत श्री महादेवांची संपूर्ण माहिती व दर्शन पडद्यावर दाखविला जाणार आहे.

तरी परिसरातील सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिनाथ वसाहत महादेव मंदिर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत