एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार!

  मुंबई(वेबटीम) डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असल...

 मुंबई(वेबटीम)



डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते होणार आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली.त्यावेळी अधिवेशनात सहभागी होण्याची ग्वाही त्यांनी दिली.दरम्यान हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभागांसह गोव्यातील डिजिटल पत्रकारही सज्ज झाले आहेत.

सावंतवाडी येथील महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तर सहस्वागताध्यक्षपद भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसलें यांनी स्वीकारले आहे.अधिवेशनाचे सन्माननीय मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षणमंत्री आ.दिपक केसरकर आहेत.या अधिवेशनाचे निमंत्रण माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे,राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आ.निलेश राणे यांनी स्वीकारलेले आहे.अधिवेशनाचे संयोजन समितीचे प्रमुख म्हणून संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष भरत केसरकर हे कार्यरत आहेत.अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध व्यापक समित्या गठित होत असून कोकणातील विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्र्यांना निमंत्रित केले जाणार आहे.आज राजा माने व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी संघटनेची आजवरची वाटचाल व सावंतवाडी येथे होणाऱ्या महाअधिवेशनाच्या कार्यक्रमांची माहिती दिली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे तत्वतः मान्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत