राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज यांचा ५९ वा फिरता नारळी सप्ताह दिनांक १८ एप्रिल २०२५ ...
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज यांचा ५९ वा फिरता नारळी सप्ताह दिनांक १८ एप्रिल २०२५ ते २५ एप्रिल २०२५ रोजी राहुरी तालुक्याच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे महंत ह.भ.प अर्जुन महाराज तनपुरे यांच्या अधिपत्याखाली संपन्न होणार असून या सप्ताहाच्या नियोजनासाठी उद्या मंगळवार दिनांक ४ मार्च रोजी दु.१ वाजता राहुरी फॅक्टरी येथील श्री.दत्त लॉन्स येथे नियोजनार्थ बैठक आयोजित करण्यात आले असून या बैठकीसाठी राहुरी तालुक्यातील उद्योग, राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक, कला, क्रीडा, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.
या बैठकीसाठी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत