श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे लवकरात ल...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे लवकरात लवकर आणून बसविण्यात यावे , या जागेचे भूमिपूजन होऊनही आद्यपर्यंत पुतळे बसविण्यात आलेले नाही. यासंदर्भात श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली येथे भेटून निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात डॉ. वंदनाताई यांनी म्हटले आहे की, “या दोन्ही महापुरुषांचे पुतळे नाशिक येथे तयार असून , नगरपालिका दरमहा भाडे रक्कम भरत असते.
या प्रश्नात प्राधान्य क्रमाने उपमुख्यमंत्री महोदय यांनी लक्ष घालून जिल्हाधिकारी याना आदेश द्यावेत
असेही डॉ. मुरकुटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत