राहुरी (प्रतिनिधी) तालुक्यातील काळे आखाडा येथील माधव जगन्नाथ निमसे यांना नुकतीच अन्न भेसळ सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळाली आहे. २०१२ मध्ये त्या...
राहुरी (प्रतिनिधी)
तालुक्यातील काळे आखाडा येथील माधव जगन्नाथ निमसे यांना नुकतीच अन्न भेसळ सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळाली आहे. २०१२ मध्ये त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन औषध निरीक्षक गट-ब पदावर धाराशिव जिल्ह्यात ते रुजू झाले. त्यानंतर २०१५ ते २०१८ संभाजीनगर, २०१८ ते २०२३ नांदेड, २०२३ ते आजपर्यंत अहिल्यानगर येथे ते कार्यरत होते. आता शासनाने त्यांना सहाय्यक आयुक्त गट-अ पदावर बढती देऊन बीड जिल्ह्यात त्यांची नियुक्ती केली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील गुंजाळ नाका परिसरातील गुंजाळ परिवाराचे ते भाचे असून त्यांच्या निवडीचे काळे आखाडा परिसरासह राहुरी तालुक्यातून स्वागत होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत