श्रीगोंदा(वेबटीम) छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिना निमित्ताने श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीरगड(बहादूरगड) पेडगाव येथे सेवा स...
श्रीगोंदा(वेबटीम)
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिना निमित्ताने श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीरगड(बहादूरगड) पेडगाव येथे सेवा समितीच्या वतीने मागील ८ वर्षापासून बलिदान स्फूर्ती दिन कार्यक्रमाची परंपरा सुरू केली आहे. यावर्षी कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून झाली. यानिमित्ताने रक्तदान शिबिर पार पडले.
यावेळी हिंदुराजा मर्दानी आखाडा संगमनेर यांच्या मावळ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळांची डोळ्याची पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली.त्यानंतर समितीचे प्रवक्ते देवयानी घरत,अमित मरळीकर, व्याख्याते खंडुजी डोईफोडे व राकेश दादा पिंजण सरकार यांनी शिवराय आणि शंभुराजे यांच्या विचारांचा जागर केला.
वैद्यकीय क्षेत्रातील निस्वार्थ उल्लेखनीय योगदानासाठी रमेश सातव, डॉ. सुलक्षणा शिलवंत (धर) यांना शंभूगर्जना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच अजय वेलनेस परिवार श्रीगोंदा, जय जवान जय किसान बहुउद्देशीय संस्था लिंपणगाव व शिवाजीराव भोस यांना विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले.
सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे व सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज धैर्यशील जाधव, समितीचे अध्यक्ष शंकर आप्पा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी डॉ.प्रतिभा पाचपुते, डॉ प्रणोती जगताप, कल्याणी लोखंडे, दिग्विजय नागवडे,अशोक खेंडके, रवींद्र गोंदकर ,आदेश नागवडे, ॲड स्वाती जाधव,गणेश झिटे, डॉ जांभळे, डॉ देशमुख, डॉ कदम,मीरा शिंदे, नवनाथ खामकर,राजेंद्र निळकंठ नागवडे, डॉ कोकाटे, पेडगावचे सरपंच इरफान पिरजादे, डॉ निलेश खेडकर, परेश कदम,छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष श्रुतिका पाडळे,आरती भोगाडे,कामिनी मेमाने, हर्षदा घुले,छाया रणपिसे,सुरेखा कांचन,रागिणी अमराळे,मंजुषा देशमुख,सारिका थोरात,सोनिया कदम,छाया डिंबळे, माधुरी डिंबळे, रूपाली कातुर्डे,जयश्री डिंबळे,शशिकला भोसेकर,सुरेखा कवडे उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत