जातप त्रिंबकपुर येथील ग्रामपंचायताचा बेभोरसे कार्यभार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जातप त्रिंबकपुर येथील ग्रामपंचायताचा बेभोरसे कार्यभार

राहुरी(वेबटीम) तालुक्यातील जातप-त्रिंबकपूर गावातील विविध विकास कामाबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी सुदर्शन मुंडे यांचे लक्ष वेधले असून वेळ...

राहुरी(वेबटीम)



तालुक्यातील जातप-त्रिंबकपूर गावातील विविध विकास कामाबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी सुदर्शन मुंडे यांचे लक्ष वेधले असून वेळोवेळी मागणी करून ग्रामसभा होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हंटले की, जातप व त्रिंबकपूर अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. परंतु या ग्रामपंचायत मध्ये गेल्या वर्षभरापासून सर्व भोंगळ कारभार सुरु आहे .या कारभारावर ग्रामसेवकांचेही नियंत्रण नाही व सरपंचही सदर विषय गांभीर्याने घेत नाही.ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही ग्रामसभा ही झालेली नाही अर्थात ही कागदोपत्री झालेली आहे परंतु जाहीर रित्त्या गेल्या वर्षभरात झालेली नाही. गावात जल जीवन मिशनचे काम सुरू आहे परंतु हे काम जातपमध्ये कुठेही दिसत नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जिल्हा नियोजन व पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कामे सुरु आहे ही कामे दर्जेदार होत नाही.

गावच्या पाणीपुरवठा योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे . याबाबतीत प्रशासनाचे प्रमुख म्हणून ग्रामसेवक ही मागणीची दखल घेत नाही.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी घरकुले मंजूर आहे या यादीमध्ये प्रचंड अशी तफावत दिसून येत आहे ज्यांना याची खरोखर गरज आहे त्यांना घरकुरले नाकारून इतर लोकांना ती देण्यात आलेली आहे. प्रचंड असा दुजाभाव झालेला आहे. तसेच गावात आरोग्याच्या दृष्टीने एकही भरीव काम झालेले नाही. गावामध्ये राबवल्या जाणाऱ्या कृषी विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना, रोजगार हमी योजना यांसारख्या योजनांची माहिती नागरिकांना वेळेवर तसेच अचूक मिळत नाही असे म्हंटले आहे.

याबाबत सचिन कोळसे, सुभेदार शेख, सुमित मुसमाडे यांनी गटविकास अधिकारी मुंडे यांना निवेदन दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत