जामखेड( अमृत कारंडे) सध्या राज्यभर विविध प्रकारची साहित्य संमेलन होत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे याचा गवगवा साहित्य, स...
जामखेड( अमृत कारंडे)
सध्या राज्यभर विविध प्रकारची साहित्य संमेलन होत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे याचा गवगवा साहित्य, सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक क्षेत्रात जोरदार चालू आहे.तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जंयती ३१/०५/२०२५ ते ३१/०५/२०२६ वर्ष भर महाराष्ट्र शासनाकडून साजरी करण्यात येणार आहे असे समजते.तसेच नवी दिल्ली येथे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. मराठी साहित्य संमेलन हे शासकीय साहित्य संमेलन असते. हे सर्व कार्यक्रम ऐकून, वाचून आपले बरेच रसिक मला फोन करून विचारत आहेत या वर्षी आपले संमेलन कोठे होणार आहे.
माघी पौर्णीमेला मी,श्री बाळासाहेब कर्णवर पाटील, नईमभाई पठाण, ईजिंनियर श्री धुळाभाऊ शेंडगे आम्ही प्रयागराजला जावून आलो. ईजिंनियर शेंडगे यांनी सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे राष्ट्रीय पातळीवर घेण्यात यावे व बेगंलोर येथे घेण्यात यावे सर्वोतोपरी मदत करु असे सांगितले.
तसेच साहित्य संमेलन विदर्भात झालेले नाही. आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे सचिव व धनगर धर्म पीठ विदर्भ प्रमुख श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर हे ही गेले तीन वर्ष प्रयत्नशील आहेत.
श्री शिवाजीराव बंडगर सर मा.सभापती बाजार समिती करमाळा, श्री बाळासाहेब टकले करमाळा हे ही साहित्य संमेलन घेण्या साठी प्रयत्न शील आहेत.
मराठी भाषा दिनानिमित्त श्री गोविंद काळे आणि उज्ज्वलकुमार माने यांनी साहित्यिकाचा सत्कार व कवी संमेलन घरगुती कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमास डाॅ.मुरहरी केळे,डाॅ.देवीदास पोटे ,डाॅ. मुकुंद वलेकर, डाॅ.वर्षा चौरे, लेखक रामभाऊ लांडे, सौ कवीता पोटे, आदि मान्यवर उपस्थित होते. श्री विनायक काळदाते अध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य यांनी व श्री समधान बागल समाज सेवक नाशिक यांनी साहित्य संमेलनाचा मांडलेला प्रस्ताव मी या साहित्यिकांच्या समोर मांडला असता त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सर्वानीच एक प्रस्ताव दिला साहित्य संमेलन ३१/५/२०२५ ते ३१/५/२०२६ या काळात व्हावे व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त व्हावे.
आता पर्यंत चे सर्व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष,साहित्य संमेलन अध्यक्ष, संयोजक, सर्व क्षेत्रातील सहभागी यांच्याबरोबर चर्चा करुन लवकरच सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य जाहीर करण्यात येईल. प्रंचड मोठा राजकीय वारसा, साहित्यीक वारसा, सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक वारसा असलेल्या धनगर जमातीचे सहावे साहित्य संमेलन तर होणारच.
प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत