देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्यावतीने २० मार्चपासून त्रिदिनी त्रिंबकराज व्याख्यानमाला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्यावतीने २० मार्चपासून त्रिदिनी त्रिंबकराज व्याख्यानमाला

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे श्री त्रिंबकराज मोफत वाचनालयाच्या वतीने गुरुवार दि.20 ते शनिवार 22 मार्च २०२५ या काल...

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)



देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे श्री त्रिंबकराज मोफत वाचनालयाच्या वतीने गुरुवार दि.20 ते शनिवार 22 मार्च २०२५ या कालावधीत समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्कृतिक भवन येथे तीन दिवसीय त्रिंबकराज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून व्याख्यानमालेचे उद्घाटन शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष, माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिली.

गुरुवार दिनांक २० मार्च रोजी सायंकाळी ६ वा. श्री अहिल्यानगर येथील ज्येष्ठ साहित्यिक, हास्य सम्राट फेम डॉ. संजय कळमकर यांचे "हसण्यासाठी जन्म आपुला" या विषयावर,शुक्रवार दिनांक २१ मार्च रोजी कोल्हापूर येथील युवा व्याख्याते युवराज पाटील यांचे "जीवन सुंदर आहे" या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर २२ मार्च रोजी पुणे येथील युवा साहित्यिक, व्याख्याते सचिन पवार यांचे " संतांनी महाराष्ट्राला काय दिले " या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेचा समारोप श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ.हेमंत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या व्याख्यानमालेसाठी देवळाली प्रवरा परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, बचत गटातील सदस्य यांनी उपस्थित राहून व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री त्रिंबकराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रथमच अशा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले असून अभ्यास करणारे विद्यार्थी व नागरिकांना याचा निश्चितच उपयोग होणार आहे, यावेळी प्रत्येक दिवशी एक शालेय विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करणार आहे. तसेच यावेळी त्रिंबकराज मोफत वाचनालयाचा लाभ घेऊन शासकीय नोकरीमध्ये यावर्षी निवड झालेल्या गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत