मनसेच्या वतीने राहुरीमध्ये सामाजिक संदेश देत शिवजयंती उत्साहात साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मनसेच्या वतीने राहुरीमध्ये सामाजिक संदेश देत शिवजयंती उत्साहात साजरी

राहुरी(वेबटीम) छत्रपती  शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाते व उप तालुकाध्यक्ष रा...

राहुरी(वेबटीम)



छत्रपती  शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाते व उप तालुकाध्यक्ष राहुल पिले यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीचा एक दिवसीय अवाढव्य खर्च टाळून गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, भोजन व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. 



छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जीवन स्वराज्यासाठी अर्पण केले होते आणि त्यांच्याच विचारांवर आधारित मनसेने समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊन समाजापुढे गरजवंत जनतेसाठी आपण सर्वानी देखील पुढे आले पाहिजे असे आवाहन केले.

तसेच यामध्ये मोलाचे योगदान राहुरीचे आमदार  शिवाजीराव कर्डिले  यांचे देखील लाभले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मनसेचे देसवंडी ग्रामपंचायत सरपंच नितीन कल्हापुरे व पक्ष व्यतिरिक्त पोलिस निरीक्षक संजय  ठेंगे राहुरी तालुका कृषी अधिकारी  बापुसाहेब शिंदे व बांधकाम विभाग अधिकारी सय्यद सर तसेच महावितरण अधिकारी वीरेश बारसे  सर यांचे देखील सहकार्य लाभले..तसेच त्याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे , उपजिल्हाध्यक्ष भाऊ उंडे, तालुकाध्यक्ष मनोज जाधव,उप तालुकाध्यक्ष राहुल पिले,  मनसे राहुरी शहराध्यक्ष प्रतीक विधाते, मनसे वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, वाहतुक सेना तालुकाध्यक्ष राजू भाऊ आढगळे,देवळाली प्रवरा शहराध्यक्ष विजय पेरणे सर, मनवीसे संघटक सागर माने, मनवीसे तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे, मनवीसे शहराध्यक्ष संदेश गायकवाड आदी मनसे सैनिक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत