राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उद्या रविवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित्त ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उद्या रविवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित्त सत्यजित कदम फाउंडेशन च्या वतीने राहुरी फॅक्टरीतील श्रीरामपूर रोड येथील वृंदावन कॉलनी येथे माता भगिनींसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या महिलांनी लाभ घ्यावा असे आव्हान प्रीती सत्यजित कदम यांनी केले आहे.
या निमित्ताने महिलांचे ढोल पथकांच सामूहिक वादन त्याचप्रमाणे होम मिनिस्टर खेळ पैठीणीचा रंगतदार कार्यक्रम तसेच सासू-सून पुरस्कार,देवळाली तारका, सन्मान माहेरचा आदी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत