राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे कानोबा उर्फ कानिफनाथ महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त येथील गुरुवर्य सुरेश अण्णा चव्हाण यां...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथे कानोबा उर्फ कानिफनाथ महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त येथील गुरुवर्य सुरेश अण्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ओम चैतन्य कानिफनाथ नाथभक्त मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बुधवार दिनांक १९ मार्च रोजी केले असून सायं. ५ वाजता काठी मिरवणूक त्याचबरोबर सायं.७.३० वाजता महाआरती व त्यानंतर ८ ते ९.३० यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सुप्रसिद्ध नाथभक्त सोनू साठे यांचे नाथभक्ती गीतांचा कार्यक्रम सायं.८.३० वा. सुरू होणार आहे.
तरी या कार्यक्रमास परिसरातील नाथभक्तांनी कराळेवाडी,राहुरी फॅक्टरी याठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन चैतन्य कानिफनाथ भक्त मंडळ परिवाराने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत