देवळाली प्रवरा/वेबटीम:- राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता(प्रगती) अभियान २०२४-२५ साठी राज्य शासनाकडून देवळाली प्रवरा नगपरिषदे...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता(प्रगती) अभियान २०२४-२५ साठी राज्य शासनाकडून देवळाली प्रवरा नगपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांना ग्रामीण - शहरी समन्वयातून मैला गाळ व्यवस्थापन या संकल्पनेला महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी शहर विकासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या असताना
देवळाली नगरपरिषद लगत असलेल्या परिसरातील ३२ गावांतील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मैला गाळ व्यवस्थापन व स्वच्छतादूत बचतगटाशी सामंजस्य करत व्यवस्थापन केल्याबद्दल राज्य सरकारने हा पुरस्कार मुख्याधिकारी विकास नवाळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
मुख्याधिकारी नवाळे यांची नुकतीच संभाजीनगर महानगरपालिका उपायुक्त पदी बढती झाली असताना राज्य सरकारकडून पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विकास नवाळे हे सन-२०२३-२४ वर्षी एरंडोल नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून काम करत असताना नागरिकांमध्ये वाचन संस्कृतीची आवड निर्माण व्हावी याकरिता त्यांनी नगरपरिषदेच्या ओपन स्पेसमध्ये पुस्तकांचा बगीचा ही नवीन संकल्पना राबविण्यात आली.त्यासाठी राज्य शासनाकडून विकास नवाळे यांना पुरस्कार जाहीर झाला असून २० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुस्तकांचा बगीचा या संकल्पनेला राज्य सरकारकडून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत