राहुरीचे राहू केतू शनी दैवत आता शनी शिंगणापूर देवस्थान प्रमाणेच विकसित- पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीचे राहू केतू शनी दैवत आता शनी शिंगणापूर देवस्थान प्रमाणेच विकसित- पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल

  राहुरी(वेबटीम) राहुरीचे राहू केतू शनी दैवत आता शनी शिंगणापूर देवस्थान प्रमाणेच विकसित होत आहे. याचा मला सर्वस्वी आनंद होत आहे. मी नेहमी शि...

 राहुरी(वेबटीम)



राहुरीचे राहू केतू शनी दैवत आता शनी शिंगणापूर देवस्थान प्रमाणेच विकसित होत आहे. याचा मला सर्वस्वी आनंद होत आहे. मी नेहमी शिर्डी शनी शिंगणापूरला येत असते तेव्हा आवर्जून राहुरीच्या राहू केतू शनीचे दर्शनास येत असते. राहुरीच्या भक्तांनी सुद्धा आपल्या या दैवताची नित्य नियमाने पूजा करून आपले दुःख, पिडा वेदना विसरण्याची शक्ती या दैवतात आहे म्हणून मी आवर्जून या दैवताचे दर्शनास येत असते. आज राहू केतू शनी मंडळाने अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बापूराव देसाई यांनी लिखित केलेल्या "राहू केतू शनी दैवत या पुस्तिकेच्या हिंदी आवृतीचे प्रकाशनआज माझ्या हस्ते केले या बद्दल मी राहूरकरांचे आभारी आहे. शनी शिंगणापूर प्रमाणे राहुरीचे हे दैवत राष्ट्रीय पातळीवर जाईल याची मला खात्री आहे असे उदगार विश्व गायिका अनुराधा पौडवाल यांनी यांनी काढले.


राहुरी येथील प्रसिद्ध असलेल्या राहू केतू शनी दैवत या प्राचार्य सुप्रसिद्ध लेखक डॉ बापूराव देसाई यांनी लिहिलेल्या राहू केतू शनी दैवत या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन विश्वगायिका अनुराधा पौडवाल यांचे हस्ते मुंबई (सांताक्रुज )येथील त्यांचे निवासस्थानी करण्यात आले त्यावेळी अनुराधा पौडवाल बोलत होत्या. यावेळी राहू केतू शनी मंदिराचे मार्गदर्शक बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचे व राहू केतू शनी मंदिर मंडळाचे श्रीपाद काका कुलकर्णी व सतीश (बाबाजी )दरक व विजयराव दौले यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

शिर्डी शिंगणापूर राज्य मार्गांवरील राहुरी शहरात असलेल्या मारुती मंदिर येथील शनी, राहू केतूचे मंदिर आहे. या राहू केतू शनीच्या दर्शनासाठी लांब लांबून भाविक दर्शनाला येतात याचे महत्व लक्षात घेऊन डॉ देसाई यांनी राहू केतू शनी दैवत या पुस्तकाचे लेखन केले होते त्या पुस्तकाचे प्रकाशन विश्व गायिका अनुराधा पौडवाल यांचे हस्ते व माजी नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे यांचे उपस्थितीत राहुरी येथे झाले होते.


सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी यावेळी सभापती अरुण तनपुरे यांचा सत्कार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत