जामखेड (अमृत कारंडे) १५ मार्च २०२५ जामखेड तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नेते म्हणून ओळख असलेले स्वप्नील खाडे यांच्यावर भारतीय ...
जामखेड (अमृत कारंडे)
१५ मार्च २०२५ जामखेड तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नेते म्हणून ओळख असलेले स्वप्नील खाडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना जामखेड येथे घडली असून स्वप्नील खाडे यांना दि. 17 फेब्रुवारी 2022 रोजी अटक करण्यात आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की स्वप्नील खाडे यांना जामखेड पोलिसांनी दि. 17 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली होती. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. 19 एप्रिल 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला. होता.त्यानंतर दि. 26 एप्रिल 2022 रोजी त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते.
त्यानंतर आता दि. 10 मार्च 2025 रोजी अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाने स्वप्नील खाडे यांना निर्दोष मुक्त केले असून न्यायालयाच्या निर्णयानुसार, आरोपीचे जामीनपत्र रद्द करण्यात आले आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 437A अनुसार पी.बी. आणि एस.बी. रु. 15,000/- ची जबाबदारी सांगितली गेली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानुसार, आरोपपत्रात नमूद केलेले मुद्दे निरुपयोगी असल्याचे नमूद करण्यात आले आणि त्यांची संचिका बंद करण्यात आली. न्यायालयाने स्वप्नील खाडे यांना भारतीय दंड संहिता कलम 307 नुसार दंडनीय गुन्ह्यांमधून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 235 (1) द्वारे निर्दोष मुक्त केले आहे.
स्वप्नील खाडे यांच्या अटकेमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण तालुक्यावर मोठा परिणाम झाला होता. त्यांच्या निर्दोष मुक्ततेमुळे त्यांच्या कुटुंबाला आणि समाजाला दिलासा मिळाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत