राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गणेगाव रोड परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शिवसेना ठाकरे गट ३२ गाव तालुकाप्रमुख विजय गव्हाणे रा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गणेगाव रोड परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शिवसेना ठाकरे गट ३२ गाव तालुकाप्रमुख विजय गव्हाणे राहुरी वनविभागाचे वनरक्षक मनोज ससे यांना पिंजरा लावण्याबाबत संपर्क केला असता ससे त्यांनी कुठं यायच, रात्रीच कुठं आता, अस उडवाउडवीची उत्तर दिली असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.
यावेळी गव्हाणे यांनी तुम्ही सुधीत आहात का अस विचारला असता नशेत असलेल्या सत्रे यांनी आधी मला ठराव द्या मग पिंजरा लावतो असे उत्तर दिले. वास्तवीक वनविभागात २४ तास अलर्ट असणे आवश्यक असताना व सध्या बिबट्याचे जीवघेणे हल्ले वाढले असताना जनसेवेसाठी हजर राहाणे गरजेचे असताना हे नशेत इतके तररर होते की त्यांना आपण काय बोलतो हे सुद्धा समजायला तयार नव्हते मी सुधीत आहे का? अशी विचारणा केली तर ठराव द्या मग पिंजरा बसू असे सांगितले. माणस गेल्यावर हे पिंजरे उभारणार का असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत खा.भाऊसाहेब वाकचौरे खा.निलेश लंके , आ.शिवाजी कर्डिले, आ.हेमंत ओगले यांच्यासह वनमंत्री यांच्याकडे सर्व पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत