जामखेड(अमृत कारंडे ) जामखेड तालुक्यातील अरणगांव सबस्टेशन अंतर्गत असणाऱ्या पिंपरखेड ते बावी लगत, वंजारवाडी ते खामगाव रोड लगत, सिंगल फेज मंजूर...
जामखेड(अमृत कारंडे)
जामखेड तालुक्यातील अरणगांव सबस्टेशन अंतर्गत असणाऱ्या पिंपरखेड ते बावी लगत, वंजारवाडी ते खामगाव रोड लगत, सिंगल फेज मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन आठ दिवसाच्या आत कामे सुरू करण्याचा आदेश अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबधित खात्याला दिला आहे.
त्यामुळे नागरिकांनी सिंगल फेज कनेक्शन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता अरणगांव उपकेंद्रात करून देऊन लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुश ढवळे यांनी शुक्रवारी केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबई येथे शुक्रवारी भेट घेऊन पिंपरखेड पंचक्रोशीतील गावांना सिंगल फेज साठी निधी मंजूर केला. याबद्दल सत्कार केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना अंकुश ढवळे म्हणाले अरणगांव सब स्टेशन मधून पिंपरखेड पंचक्रोशीतील वारंवार होणारा खंडित व कमी दाबाने वीज पुरवठ्यामुळे वीज पंप जळण्याचे प्रमाण वाढले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रयत्न करून जवळा जिल्हा परिषद गटातील जवळपास 35 ठिकाणी नवीन डिपी बसवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दाबाने वीज पुरवठा झाला होता. पिंपरखेड, बावी, वंजारवाडी खामगाव व अनेक गावातील नागरिकांना सिंगल फेज आभावी पूर्ण वेळ वीज पुरवठा उपलब्ध होत नव्हता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत