देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठानच्यावतीने उद्या गुरुवार दिनांक ६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाज...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठानच्यावतीने उद्या गुरुवार दिनांक ६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता श्री साई मंदिरात जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देवळाली प्रवरा परिसरातील माजी सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या धर्म पत्नींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
श्री साई प्रतिष्ठानने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासले असून गेल्या वर्षी महिला दिनानिमित्त देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील झाडू काम करणाऱ्या सफाई कामगार महिलांचा सन्मान केला होता. यंदा माजी सैनिक व पोलीस दलात कार्यरत असलेल्या धर्म पत्नींचा गौरव सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन श्री साई प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत