जामखेड(अमृत कारंडे) जामखेड तालक्यातील खर्डा येथील बसस्थानका समोरील शासकीय गोदाम पाडणे व व नदी पत्रामध्ये अतिक्रमण करणाऱ्या संबधित व्यक्तींवर...
जामखेड(अमृत कारंडे)
जामखेड तालक्यातील खर्डा येथील बसस्थानका समोरील शासकीय गोदाम पाडणे व व नदी पत्रामध्ये अतिक्रमण करणाऱ्या संबधित व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करावा यासाठी आज दि. २१ मार्च रोजी खर्डा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांचीभेट घेऊन निवेदन दिले. त्यानुसार सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येतील असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
सदर निवेदनत म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील मौजे खर्डा येथील बस स्थानका समोरील जुने महावितरण कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच जुनी १९६९ साली बांधकाम झालेली शासकीय गोदामाच्या इमारतीवरील पत्रे व लोखंडी साहित्य काढून मागील दोन दिवसापूर्वी भंगार मध्ये विक्री केली गेली. तसेच काल दि. १८/०३/२०२५ रोजी संपूर्ण इमारत जे. सी. बी. यंत्राच्या साह्याने उदवस्त केली. याबरोबरच जे. सी. बी. च्या साह्याने गोदाम पाडत असताना जवळील गाळे धारकांनी विचारणा केली असता अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दहशत माजवण्याचा प्रयत्न सदर महिला व तिच्या मुलाने केला. तसेच गाळे धरकावर खोटे गुन्हे दाखल करण्याची भाषा केली. व खर्डा येथील खर्डा जामखेड रोड (पूल) लगत नदी पात्रामध्ये जुना घिसाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोडवरती नदी पात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम करून नदीचे पात्र कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गोदामाचे साहित्य विक्री व गोदाम पाडले तसेच नदी पात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम केले गेले आहे. हा सर्व प्रकार श्रीमती ज्योती शिरीष गोलेकर व मुलगा संग्राम शिरीष गोलेकर यांनी उभा राहून त्या ठिकाणी आमचे समक्ष केले आहेत. तसेच गोडाऊन पाडण्यासाठी जे. सी. बी. मालक सुमित चावणे व जे. सी. बी. चालक तुकाराम सुरवसे यांनी मदत केली आहे. तरी सदर प्रकरणी तातडीने लक्ष घालून दोषी लोकांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही खर्डा ग्रामस्थ दि. २७/०३/२०२५ पासून जामखेड तहसील कार्यालय येथे अमरण उपोषणास बसणार होते. या दरम्यान काही अनुचित घटना घडल्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील. असाही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी शिवाजी भोसले, सूरज कोठावळे, आकाश खेडकर, दत्ता भोसले, नेताजी भोसले, अनिल राऊत, उमेश गुरसाळी, रघुनाथ खेडकर, शरद थोरात, संभाजी भोसले, रुक्मिणी भोसले, लक्ष्मी खेडकर ,वर्षा खेडकर, सुनिता कोठावळे ,रत्नमाला भोसले, सुनामी बागवान ,रूपाली राऊत ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत