राहुरी(वेबटीम) जिल्ह्यातील अग्रगण्य ठरलेल्या साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालयाचा वर्धापन दिन शनिवार...
राहुरी(वेबटीम)
जिल्ह्यातील अग्रगण्य ठरलेल्या साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालयाचा वर्धापन दिन शनिवार दिनांक ८ मार्च रोजी होत आहे. या निमित्ताने सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात कपाळे यांनी म्हटले की साई आदर्श मल्टीस्टेटच्या प्रेरणादायी वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक ७ मार्च रोजी सकाळी दहा वाजता साई आदर्श मल्टीस्टेट व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी दहा ते चार मोफत नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आवश्यक असणारे व्यक्तींना मोफत चष्मा वाटप तसेच त्यांना शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठवण्यात येणार आहे. तेथे त्यांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून त्यांना जाण्याच्या व भोजनाचा खर्च साई आदर्शच्या वतीने केला जाणार आहे. गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन साई आदर्श मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाने केले.
तसेच शनिवार दिनांक ८ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता श्रीरामपुरचे पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपूजे,राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, डॉ. स्वप्नील माने, डॉ. प्रीतम वडगावे ,डॉ. महेश मिस्तरी, देवळाली नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विकास नवाळे , राधिका कोहकडे व नव्याने निवड झालेले पूजा बाजीराव पवार, हर्षदा शिंदे ,वैभव लांडगे ,अभिषेक कटारे ,संदीप हिंगे, सौरभ जाधव ,राहुल सप्रे ,शुभांगी बाचकर, रवीना कदम, सुनीता बर्डे, या सर्वांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रेरणादायी व्याख्याते राहुल गिरी यांचे “उद्याचे पिढी घडवताना” या विषयावर व्याख्यान होणार आहे त्यानंतर स्नेहभर्णाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास ठेविदार सभासद खातेदार हितचिंतक मित्रपरिवार ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन कपाळे व संचालक मंडळांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत