राहुरी(प्रतिनिधी) मानोरी येथील तलाठी कार्यालयात गांव कामगार तलाठीचे ७/१२ रजिष्टर फेकुन देऊन गांवात नोकरी करायची का म्हणून शिवीगाळ करुन, जिव...
राहुरी(प्रतिनिधी)
मानोरी येथील तलाठी कार्यालयात गांव कामगार तलाठीचे ७/१२ रजिष्टर फेकुन देऊन गांवात नोकरी करायची का म्हणून शिवीगाळ करुन, जिवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणले प्रकरणी दोन आरोपींची अ.नगर जिल्हा न्यायालयात नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणी सविस्तर हकीकत अशी की, मानोरी येथे दि. २०/०५/२०१६ रोजी दुपारी १५.०० वाजता मानोरी येथील तलाठी कार्यालयात फिर्यादी हा शासकिय कामकाज करत असतांना आम्हांला शेतीची उतारे द्या, त्यावेळी फिर्यादी त्यांना म्हणाले की, दोन मिनीटे थांबा उतारे देतो, त्याचा आरोपींना राग येऊन टेबलावरील ७/१२ उतारा रजिष्टर घेऊन फेकून देऊन " तुला गांवात नोकरी करावयाची का ", असे म्हणून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणला. अशा प्रकारची फिर्याद गांव कामगार तलाठी, मानोरी यांनी पोलीस स्टेशन राहुरी येथे दिली.
त्यावेळेस पोलीसांनी सदर फिर्यादीस एफ.आय.आर. नं. 1 १९५/२०१६ असा क्रमांक देऊन पुढील तपासासाठी तपासी अधिकाऱ्याकडे दिला. तपासी अधिकारी यांनी सदर गुन्हयामध्ये साक्षीदारांची जाब जबाब घेऊन, पंचनामे करुन सदर गुन्हयाचा तपास पुर्ण केला व सदर गुन्हयाचे दोषारोपपत्र मे. न्यायालयात पाठवून दिले. सदर खटल्यास सेशन केस नं. १८६/२०२३ असा क्रमांक पडला. सदर खटला हा अ.नगर येथील तदर्थ जिल्हा न्यायाधिश व अतिरिक्त सत्र न्यायाधिश महेश सी. तिवारी यांचेसमोर चालला. सदर खटल्यात साक्षीदारांचे जाब जबाब झाले व सबळ पुराव्या अभावी आरोपी नामे रावसाहेब सयाराम चुळभरे व नानासाहेब सयाराम चुळभरे, रा. मानोरी यांची दि.०६/०३/२०२५ रोजी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे जेष्ठ विधिज्ञ व नोटरी पब्लिक अॅड प्रकाश संसारे यांनी काम बघितले. सदर खटल्याकडे संपूर्ण राहुरी तालुक्याचे लक्ष लागले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत