राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवराचे भूमिपुत्र तथा आपल्या आवाजातून महाराष्ट्रभर नावलौकिक मिळविलेले वैभव ढुस यांनी लिख...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवराचे भूमिपुत्र तथा आपल्या आवाजातून महाराष्ट्रभर नावलौकिक मिळविलेले वैभव ढुस यांनी लिखित केलेल्या 'अंत अस्ति प्रारंभ' The end is the beginning या पुस्तकाची अवघ्या १८० दिवसांत लाखो प्रतींची विक्रमी विक्री झाली आहे.
आपल्या आवाजातून महाराष्ट्रभर सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत आलेले वैभव ढुस यांनी काही दिवसांपूर्वीच स्वलिखित :
'अंत अस्ति प्रारंभ' The end is the beginning या पुस्तकाचे प्रकाशन केले असता महाराष्ट्रभर नव्हे तर परराज्यातही या पुस्तकाची चर्चा होत अवघ्या १८० दिवसात लाखो प्रतींची विक्रमी विक्री झाली आहे.
शेवट हीच माणसाची पुन्हा उभारी घेण्यासाठीची नवी सुरुवात असते हेच या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न ढुस यांनी केला आहे.
यामुळेच असंख्य वाचकाच्या पसंतीस उतरलेलं हे पुस्तक महाराष्ट्रभर चर्चिले जात आहे.
लेखक वैभव ढुस यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत