पानेगांव (वार्ताहर) विद्यार्थ्यांचा कला गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन महत्त्वाची असतात असे प्रतिपादन नेवासे पंचायत समितीचे गटशिक्षणा...
पानेगांव (वार्ताहर)
विद्यार्थ्यांचा कला गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन महत्त्वाची असतात असे प्रतिपादन नेवासे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानेगांव २०२५ वार्षिक स्नेहसंमेलनात केले.
कराड यांनी म्हटले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी आता मागे नाही. वेगवेगळ्या कला त्यांचा अंगात असतात ह्या कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरात आयोजन करण्यात येते. शासन स्तरावरून निधी नसताना शिक्षक वृंद, ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी गावातील सामाजिक कार्यकर्ते यांचा अर्थिक मदतीने हे आयोजन होत असते. येथिल शाळा तालुक्यात आदर्शवत असून येथील शिक्षक वृंद तसेच शाळेसाठी योगदान देणाऱ्यांचे विशेष कौतुक कराड यांनी करुन जिल्हा स्तरावर आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळावा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेल कराड यांनी सांगितले.
यावेळी मा.लोकनियुक्त सरपंच मुळाचे संचालक संजय जंगले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शाळेसाठी नेहमीच अग्रभागी असतो तालुक्यात डिजिटल शाळा त्याचबरोबर येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे शाळा बघण्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकारी तसेच नेहमी लोकं येतं असतात.
जवळपास तीन तास चाललेल्या कार्यक्रमात चिमुकल्यांचा तालावर आनंदाचा जल्लोष मध्ये नव्या जून्या देश गीतं भक्ती गीते गाण्यांबरोबरचं छत्रपती संभाजी महाराजांचा जिवनावरील छावा चित्रपटातील गीतांच मोठं आकर्षण या निमित्ताने ठरलं यावेळी भरभरून प्रतिसादा बरोबरच बक्षीस मोठ्या प्रमाणावर मिळाले.
यावेळी जिल्हा परिषद सोनई केंद्र प्रमुख हनुमंत फुंदे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय जंगले,पानेगांव लोकनियुक्त सरपंच सौ.निकीता भोसले/आंबेकर, उपसरपंच दत्तात्रय घोलप, मुख्याध्यापक विष्णू दहिफळे, मच्छिंद्र खेमनर,अरुण ढेरे,छाया देठे, संकेत गुडधे, मंगल गुडधे,सविता जंगले,गोदा चिंधे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले,ग्रामपंचायत सदस्य सतिश जंगले, ज्ञानेश्वर जंगले,माजी सरपंच हौशाबापू जंगले, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष किशोर जंगले,महालक्ष्मी देवस्थान अध्यक्ष अमित जंगले,आमराई उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरज जंगले, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील,नामदेव गुडधे,अनिल चिंधे,उत्तम तांबे, ज्ञानदेव गुडधे, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे, उपाध्यक्ष सुरेंद्र जंगले, मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, बाबासाहेब शेंडगे, गणेश गायकवाड सुनिल चिंधे, शुभम जंगले, मोहनराव दहिफळे,लक्ष्मीकांत जंगले, आरुण सोनवणे, गणेश जंगले,रामदास गागरे ,लक्ष्मण गागरे, रविंद्र सोनवणे, प्रविण सोनवणे, किरण जंगले आदींसह ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन संदिप जंगले यांनी केले आभार संकेत गुडधे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत